Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 14,307

गेल्या 24 तासांत देशात 1,225 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 184 कोटी 06 लाखांचा (1,84,06,55,005) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,19,86,205 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 1 कोटी 60 लाखांहून अधिक किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या गटनिहाय विभागणीत खालील मात्रांचा समावेश आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 10403635
2nd Dose 9999355
Precaution Dose 4455582
FLWs 1st Dose 18413143
2nd Dose 17508690
Precaution Dose 6858397
Age Group 12-14 years 1st Dose 16081696
Age Group 15-18 years 1st Dose 57108229
2nd Dose 37947928
Age Group 18-44 years 1st Dose 554549678
2nd Dose 465540817
Age Group 45-59 years 1st Dose 202738270
2nd Dose 185239023
Over 60 years 1st Dose 126729917
2nd Dose 115382831
Precaution Dose 11697814
Precaution Dose 2,30,11,793
Total 1,84,06,55,005

देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन 14,307 झाली आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या केवळ 0.03% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,594 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,89,004 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 1,225 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 6,07,987 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78 कोटी 91 लाखांहून अधिक (78,91,64,922) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातील साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.23% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील  0.20%.इतका नोंदला गेला आहे.

Exit mobile version