गेल्या 24 तासांत देशात 1,225 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 184 कोटी 06 लाखांचा (1,84,06,55,005) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,19,86,205 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 1 कोटी 60 लाखांहून अधिक किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांच्या गटनिहाय विभागणीत खालील मात्रांचा समावेश आहे:
Cumulative Vaccine Dose Coverage | ||
HCWs | 1st Dose | 10403635 |
2nd Dose | 9999355 | |
Precaution Dose | 4455582 | |
FLWs | 1st Dose | 18413143 |
2nd Dose | 17508690 | |
Precaution Dose | 6858397 | |
Age Group 12-14 years | 1st Dose | 16081696 |
Age Group 15-18 years | 1st Dose | 57108229 |
2nd Dose | 37947928 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 554549678 |
2nd Dose | 465540817 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 202738270 |
2nd Dose | 185239023 | |
Over 60 years | 1st Dose | 126729917 |
2nd Dose | 115382831 | |
Precaution Dose | 11697814 | |
Precaution Dose | 2,30,11,793 | |
Total | 1,84,06,55,005 |
देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन 14,307 झाली आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या केवळ 0.03% आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,594 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,24,89,004 झाली आहे.
गेल्या 24 तासांत, देशात 1,225 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 6,07,987 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 78 कोटी 91 लाखांहून अधिक (78,91,64,922) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशातील साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील सातत्याने कमी होत आहेत. देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.23% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर देखील 0.20%.इतका नोंदला गेला आहे.