गेल्या 24 तासात 4,575 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 46,962

गेल्या 24 तासात  18.69  (18,69,103)  लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 179.33 (1,79,33,99,555)  कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,08,48,528 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,02,292
2nd Dose 99,78,958
Precaution Dose 42,68,734
FLWs 1st Dose 1,84,10,832
2nd Dose 1,74,66,501
Precaution Dose 64,41,480
Age Group 15-18 years 1st Dose 5,55,80,872
2nd Dose 3,20,34,392
Age Group 18-44 years 1st Dose 55,28,59,320
2nd Dose 45,16,84,524
Age Group 45-59 years 1st Dose 20,24,50,051
2nd Dose 18,18,71,562
Over 60 years 1st Dose 12,65,40,606
2nd Dose 11,32,63,060
Precaution Dose 1,01,46,371
Precaution Dose 2,08,56,585
Total 1,79,33,99,555

 

गेल्या 24 तासांत 7,416 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,24,13,566 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.69% झाला आहे.

गेल्या 24 तासात 4,575 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  46,962 आहे.  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.11% आहे.

 

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 8,97,904  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77.52  (77,52,08,471) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.62% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.51% आहे.