देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 168.47 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 14,35,569 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 3.42% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 95.39% आहे.
गेल्या 24 तासात 2,46,674 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,00,17,088 वर
गेल्या 24 तासात 1,49,394 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (9.27%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (12.03%)
आतापर्यंत एकूण 73.58 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 16,11,666 चाचण्या करण्यात आल्या
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 165.20 कोटींपेक्षा अधिक लसीच्या मात्रा केल्या उपलब्ध
देशभरात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली. कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाचा सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा 21 जून, 2021 पासून सुरु झाला. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करण्याच्या दृष्टीने लसींची अधिक उपलब्धता, लसींच्या साठ्याविषयी आगाऊ सूचना आणि लसींची पुरवठा साखळी सुनियोजित करणे या माध्यमातून लसीकरण मोहिमेची गती वाढविण्यात आली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा पुरवठा विनामूल्य करत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नवीन टप्प्यात, केंद्र सरकार देशातील लस उत्पादकांद्वारे उत्पादित 75% लस खरेदी करून या लसीचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना (विनामूल्य) पुरवठा करत आहे.