Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासांमध्ये कोरोना संसर्ग झालेल्या 12,516 नवीन रूग्णांची नोंद

गेल्या 24 तासांमध्ये देशात 53,81,889 जणांना कोविड प्रतिरोधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. आता 110.79 कोटी (1,10,79,51,225) लस मात्रा  देवून नवीन टप्पा गाठला आहे. आज सकाळी 7.00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या हंगामी अहवालानुसार 1,13,18,816 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. –

HCWs 1st Dose 1,03,80,018
2nd Dose 93,07,096
 

FLWs

1st Dose 1,83,73,522
2nd Dose 1,61,23,036
 

Age Group 18-44 years

1st Dose 42,92,51,634
2nd Dose 16,30,73,557
 

Age Group 45-59 years

1st Dose 17,75,00,331
2nd Dose 10,27,21,593
 

Over 60 years

1st Dose 11,12,54,170
2nd Dose 6,99,66,268
Total 1,10,79,51,225

 

गेल्या 24 तासांमध्ये 13,155 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. यामुळे आत्तापर्यंत ही महामारी आल्यापासून कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या 3,38,14,080  इतकी झाली आहे.

त्याचबरोबर देशाचा रूग्ण बरे होण्याचा दर आता 98.26 टक्के झाला आहे.

केंद्र सरकार आणि राज्ये सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश यांनी संयुक्तपणे केलेल्या प्रयत्नांमुळे सलग 138 दिवसांपासून नव्याने दररोज नव्याने होणारी रूग्णनोंद 50,000 पेक्षा कमी होण्याचा कल कायम टिकून आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात  12,516 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे.

देशामध्ये उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 1,37,416 आहे. ही संख्या गेल्या 267 दिवसांतली सर्वात कमी संख्या  आहे. देशातल्या आत्तापर्यंतच्या एकूण बाधित रूग्णसंख्येच्या  ती 0.40 टक्के  इतकी आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

संपूर्ण देशभरामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 11,62,286 चाचण्या करण्यात आल्या. देशात आत्तापर्यंत जवळपास 62.10 कोटींहून अधिक  (62,10,67,350) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सध्या देशाचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.10 टक्के आहे. हा दर गेल्या 49 दिवसांपासून सातत्याने दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.07 टक्के असल्याची नोंद झाली आहे. गेल्या 39 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांहून  कमी आहे आणि गेल्या सलग 74 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Exit mobile version