Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

Covid 19 : गेल्या 24 तासात 1.93 लाखांहून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे

भारतात एकूण लसीकरणाची व्याप्ती वाढून 13.54 कोटी मात्रांच्यावर पोहोचली

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत , देशात  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या एकूण 13.54 कोटींहून अधिक  मात्रा देण्यात आल्या.

अंतरिम अहवालानुसार , आज सकाळी 7 वाजेपर्यंत  19,38,184 सत्रांच्या माध्यमातून  लसीच्या एकूण 13,54,78,420 मात्रा देण्यात आल्या. यात पहिली मात्रा घेतलेले  92,42,364 आरोग्य कर्मचारी आणि दुसरी मात्रा घेतलेले 59,04,739 आरोग्य कर्मचारी,कोविड विरोधातील लढ्यात आघाडीवर राहून काम करणारे  1,17,31,959 कर्मचारी ( पहिली मात्रा) , 60,77,260 आघाडीवरील कर्मचारी ( दुसरी मात्रा ),  60 वर्षांवरील पहिली मात्रा घेतलेले 4,85,34,810 लाभार्थी आणि दुसरी मात्रा घेतलेले 65,21,662 लाभार्थी तसेच 45 ते 60 वयोगटातील 4,55,64,330 लाभार्थी      (पहिली मात्रा ) आणि 19,01,296 लाभार्थी (दुसरी मात्रा ) यांचा समावेश आहे.

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रांपैकी  59.08% मात्रा आठ राज्यांत देण्यात आलया आहेत.

खालील आलेख सर्वाधिक लसीकरण केलेल्या   8 राज्यातील मात्रांची संख्या  अधोरेखित करतो

गेल्या  24 तासात लसीच्या  31 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण मोहिमेच्या 97  व्या दिवशी (22एप्रिल ,2021) रोजी  लसीच्या 31,47,782 मात्रा देण्यात आल्या . देशभरात 28,683 सत्रांच्या माध्यमातून 19,25,873 लाभार्थ्यांनी  पहिली मात्रा तर 12,21,909 लाभार्थ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली.

गेल्या 24 तासात 3,32,73 नवीन रुग्णांची नोंद झाली.

नवीन रुग्णांपैकी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये 75.01% रुग्ण आढळले.

महाराष्ट्रात सर्वाधिक 67,013 इतक्या दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये 34,254 तर केरळमध्ये  26,995 नवीन रुग्ण आढळले.

खाली दर्शविल्याप्रमाणे ,   बारा राज्य, दैनंदिन नवीन रुग्णांचा  ऊर्ध्वगामी कल दर्शवित आहेत.

खालील आलेख भारतातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर  आणि प्रति दशलक्ष  चाचण्यांचा वाढता  कल अधोरेखित करतो

भारतातील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 24,28,616 वर पोहोचली आहे. देशातील एकूण बाधितांपैकी 14.93% ही संख्या आहे. गेल्या 24 तासात  एकूण सक्रिय रुग्णसंख्येत 1,37,188 रुग्णांची वाढ नोंदविण्यात आली.

भारतातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी , महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यात एकूण 59.12% सक्रिय रुग्ण आहेत.


भारतात आजपर्यंत 1,36,48,159  रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 83.92%.आहे.

गेल्या 24  तासात 1,93,279  रुग्ण बरे झाले.

राष्ट्रीय मृत्युदर कमी होत असून तो सध्या 1.15%. इतका आहे.

गेल्या 24  तासात 2,263 मृत्यूंची नोंद झाली.

दहा राज्यात 81.79% नवे मृत्यू झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक (568) मृत्यू झाले . त्याखालोखाल दिल्लीत 306 दैनंदिन मृत्यूंची नोंद झाली.

गेल्या 24  तासात  दीव दमण आणि दादरा आणि नगर हवेली, त्रिपुरा , मेघालय , मिझोरम , लक्षद्वीप , नागालँड , अरुणाचल प्रदेश ही  सात राज्य/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये  कोविड 19 मुळे झालेल्या एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

Exit mobile version