Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 लाखांपेक्षा कमी

एकूण बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने पार केला 80 लाखांचा टप्पा, निदान चाचण्यांच्या संख्येने 12 कोटींचा टप्पा ओलांडला

जागतिक महामारीशी लढा एकत्रितपणे देताना भारताने अनेक मैलाचे दगड पार केले. भारतातील सक्रिय रूग्णांची संख्या 106 दिवसांत प्रथमच 5 लाखांहून कमी झाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आज 4,94,657 इतकी आहे. 28 जुलैला ही संख्या 4,96,988 होती. उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण एकूण कोविडबाधितांच्या संख्येच्या 5.73% आहे.

यावरून देशातील उपचाराधीन रुग्णसंख्येतील घसरणीतील सातत्य स्पष्ट होते. जगातील अनेक देशांमध्ये नवीन रुग्णसंख्येचा आकडा वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर हे लक्षणीय आहे.

हे अजोड यश म्हणजे केंद्रसरकारच्या शाश्वत, वर्गीकृत आणि अचूक धोरणे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेली परिणामकारक अंमलबजावणी, वैद्यकीय व्यावसायिक तसेच कोविड 19 योदध्यांनी दिलेली समर्पित आणि निस्वार्थ सेवा याचाच परिपाक आहे.

27 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रिय रुग्ण 20,000 पेक्षा कमी आहेत.

फक्त 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण 20,000 पेक्षा जास्त आहे; फक्त दोन राज्यांमध्ये (केरळ  आणि महाराष्ट्र) सक्रिय रुग्णसंख्या 50,000 पेक्षा जास्त आहे.

गेल्या 24 तासात 44,281 नवे रुग्ण नोंदवले गेले, तर उपचाराधीन रुग्णसंख्या 50,326  होती. सलग 39व्या दिवशी बरे होणाऱ्यांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे.

बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे तसेच एकूण रोगमुक्त आणि उपचाराधीन यांच्या संख्येतील तफावतही वाढत आहे.

एकूण रोगमुक्तांच्या संख्येच्या आकड्याने 80 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आजमितीस रोगमुक्तांची एकूण संख्या 80,13,783 आहे. रोगमुक्त आणि उपचाराधीन यांच्या संख्येतील तफावत 75,19,126 एवढी जास्त आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर 92.79% आहे.

अजून एक नोंदवण्याजोगा मैलाचा दगड म्हणजे निदान चाचण्यांनी 12 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या 24 तासात 11,53,294 निदान चाचण्या झाल्या.

बाधितांच्या दैनंदिन संख्येत घट येण्याचे कारण म्हणजे निदान चाचण्यांची वाढवलेली संख्या होय.

मोठ्या प्रमाणावरील निदान चाचण्यांमुळे लोकसंख्येतील बाधितांचे प्रमाण लक्षात येते, जेणेकरून बाधित नसलेल्यांना संसर्ग न होउ देण्याची खबरदारी घेता येते.

दैनंदिन नवी रुग्णसंख्या 50,000 हून कमी झाली आहे.

नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 77% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.

महाराष्ट्रात दैंनदिन रोगमुक्तांची संख्या ही 6,718 एवढी नोंदवली गेली तर केरळमध्ये ती त्याखालोखाल 6,698 एवढी तर दिल्लीत 6,157 एवढी नोंदवली गेली.

नव्या नोंद झालेल्या रुग्णांपैकी 78% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

एका दिवसात नोंद झालेली रुग्णसंख्या दिल्लीत सर्वाधिक म्हणजे 7,830 तर त्या खालोखाल केरळात 6,010 एवढी आहे,

कोविड मृत्यूंपैकी 79% 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

गेल्या 24 तासात 512 मृत्यू नोंदवले गेले. मृत्यूदर 1.48% असून तो कमी कमी होत आहे.

महाराष्ट्रातील 110 ही सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे त्यापाठी दिल्ली आणि पश्चिम बंगालात अनुक्रमे 83 व 53 मृत्यू झाले.

Exit mobile version