Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोरोनातून रोगमुक्त होण्याचा दर 85 टक्क्यापेक्षा जास्त

सक्रीय रुग्णांच्या आणि रोगमुक्त झालेल्यांच्या आकडेवारीत 48 लाखांचे अंतर

कोविड संसर्गावर मात करण्यात भारताने उल्लेखनीय टप्पा ओलांडला आहे. राष्ट्रीय रोगमुक्ती दर आज 85 टक्क्यावर पोहोचला असून गेल्या काही आठवड्यांमध्ये रोगमुक्त होणाऱ्यांच्या संख्येचा आलेख सतत चढता राहिला आहे. गेल्या 24 तासांमध्ये पुन्हा एकदा नव्याने बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा रोगमुक्त झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले.

देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 82,203 व्यक्ती रोगमुक्त झाल्या असून नवीन बाधित रुग्णांची संख्या 72,049 इतकी आहे. आतापर्यंत कोरोना संसर्गातून 57,44,693 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर सर्वात जास्त रोगमुक्त झालेल्यांच्या यादीत भारताने अव्वल स्थान कायम राखले आहे.

WhatsApp Image 2020-10-07 at 10.37.25 AM.jpeg

रोगमुक्तीची पातळी सतत जास्त राखल्यामुळे देशात सक्रीय रुग्ण आणि रोगमुक्त व्यक्ती यांच्या संख्येतील तफावत सतत वाढताना दिसत आहे.सध्या सक्रीय असलेल्या 9,07,883 रुग्णांच्या तुलनेत रोगमुक्त झालेल्यांची संख्या 48,36,810 म्हणजे 48 लाखांनी जास्त आहे. रोगमुक्तांची संख्या सक्रीय रुग्णांच्या 6.32 पट आहे यावरून देशात संसर्ग मुक्त होणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे हे सुनिश्चित झाले आहे.

सध्या सक्रीय असणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या फक्त 13.44 टक्के आहे आणि हा दर सतत कमी होताना दिसत आहे.

रोगमुक्तीचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमाण लक्षात घेतले तर 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता रोगमुक्तीचा दर उर्वरित देशातील दरापेक्षा जास्त नोंदला आहे.

WhatsApp Image 2020-10-07 at 10.37.24 AM.jpeg

देशातील नव्याने रोगमुक्त झालेल्यांपैकी 75 टक्के व्यक्ती महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामीळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, ओडिशा, छत्तिसगढ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमधील आहेत. तसेच एका दिवसात रोगमुक्त होणाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्र प्रथम स्थानावर असून तिथे सर्वात जास्त म्हणजे 17,000 व्यक्ती रोगमुक्त झाल्या आहेत तर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर असून तिथे 10,000 व्यक्ती रोगमुक्त झाल्या आहेत.

WhatsApp Image 2020-10-07 at 10.37.23 AM.jpeg

देशभरात गेल्या 24 तासांत 72,049 नव्याने बाधित रुग्ण आढळले आहेत.

त्यापैकी 78टक्के रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकवटले आहेत.

इथेही महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असून तिथे 12,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत, त्याखालोखाल कर्नाटक मध्ये सुमारे 10,000 नवे रुग्ण नोंदले गेले आहे.

WhatsApp Image 2020-10-07 at 10.37.21 AM.jpeg

देशात गेल्या 24 तासांच्या कालावधीत कोविडमुळे 986 रुग्णांचा मृत्यू झाल असून त्यापैकी 83 टक्के मृत्यू 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले आहेत.

महाराष्ट्रात 37 टक्के रुग्णांचा म्हणजे 370 जणांचा मृत्यू झाला असून कर्नाटकात 91 जण मृत्युमुखी पडले आहेत.

WhatsApp Image 2020-10-07 at 10.37.22 AM.jpeg

दर वर्षी, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत विविध जातीधर्मांचे सण तसेच उत्सव साजरे होतात. त्यासाठीचे विविध कार्यक्रम एक दिवस किंवा आठवडा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सुरु राहतात आणि त्यादरम्यान धार्मिक पूजा, जत्रा, मिरवणुका,सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे यांच्या आयोजनामुळे मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र जमतो. या वर्षी पसरलेल्या कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, सण किंवा उत्सवादरम्यान ह्या संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही प्रमाणित मार्गदर्शक कार्य प्रणाली जारी केल्या आहेत.

Exit mobile version