सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट,

देशात 5 आठवड्यांपासून सातत्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नव्या रूग्णांपेक्षा अधिक

देशात गेल्या 24 तासांत कोरोनारुग्णांची संख्या  50,000 हजार पेक्षा आढळली आहे, तर याच काळात 54,000 पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.गेल्या पाच आठवड्यांपासून भारतात, कोरोना संसर्गित रूग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने जास्त राहिले आहे.

गेल्या 24 तासात 54,157 कोविड रुग्ण उपचारानंतर बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. तर याच काळात देशात 47,638 नवे रुग्ण आढळले आहेत.

WhatsApp Image 2020-11-06 at 10.25.01 AM (1).jpeg

गेल्या पाच आठवड्यांपासून देशात दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दररोज रुग्णांची सरासरी संख्या 73,000 पेक्षा अधिक असायची,मात्र आता ही संख्या सुमारे 46,000  रुग्णांपर्यंत कमी झाली आहे.

WhatsApp Image 2020-11-06 at 10.30.16 AM.jpeg

सक्रीय रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होतांना दिसते आहे. सध्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 5,20,773 इतकी आहे, देशातील एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे प्रमाण केवळ 6.19% इतके आहे.

WhatsApp Image 2020-11-06 at 10.25.00 AM (1).jpeg

सक्रीय रूग्णांच्या संख्येत होत असलेल्या घसरणीमागे महत्वाचे कारण म्हणजे नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने अधिक आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आज 7,765,966 इतकी आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्यात सुमारे 72.5 लाखांचा (72,45,193) फरक आहे. यामुळे देशात रुग्ण बरे होण्याचा दर 92.32% इतका झाला आहे.

नव्याने बरे झालेल्या कोविड रुग्णांपैकी 80% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहे.

एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 11,000 रुग्ण बरे झाले आहेत.

WhatsApp Image 2020-11-06 at 10.25.00 AM.jpeg

तर नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी 79% टक्के रुग्ण देखील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 10,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले असून त्याखालोखाल केरळ मध्ये 9,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

WhatsApp Image 2020-10-18 at 10.02.39 AM.jpeg

गेल्या 24 तासात देशभरात कोरोनामुळे 670  मृत्यू झाले. यापैकी 86% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

तर त्यातही 38 टक्के मृत्यू (256) महाराष्ट्रात आणि त्यापाठोपाठ दिल्लीत सर्वाधिक (66) मृत्यू झाले आहेत.

WhatsApp Image 2020-11-06 at 10.24.59 AM.jpeg