Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोरोनामुक्तीचा दर वाढून 97.35% पर्यंत पोहोचला

गेल्या 24 तासांत 41,383 नवीन कोरोनारुग्णांची नोंद

भारतात आतापर्यंत एकूण 41.78 कोटीपेक्षा अधिक व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या तात्कालिक अहवालानुसार, कोरोना प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत 51,60,995 सत्रांद्वारे एकूण 41,78,51,151 मात्रा, देण्यात आल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत लसींच्या 22,77,679  मात्रा देण्यात आल्या.

याचा तपशील पुढीलप्रमाणे-:

HCWs 1st Dose 1,02,77,386
2nd Dose 76,11,600
FLWs 1st Dose 1,78,24,546
2nd Dose 1,05,49,835
Age Group 18-44 years 1st Dose 13,05,53,816
2nd Dose 53,22,634
Age Group 45-59 years 1st Dose 9,89,17,103
2nd Dose 3,15,85,098
Over 60 years 1st Dose 7,26,86,361
2nd Dose 3,25,22,772
Total 41,78,51,151

दि. 21 जून 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. देशभर लसीकरणाचा वेग व व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.

या महामारीच्या आरंभापासून विचार करता, बाधित रुग्णांपैकी 3,04,29,339 व्यक्ती आतापर्यंत कोरोनातून बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या चोवीस तासांत 38,652 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्तीचा दर सातत्याने वाढत असून आता तो 97.35% पर्यंत पोहोचला आहे.

भारतात गेल्या 24 तासांत 41,383 नवीन कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या सलग 25 दिवसांपासून, दैनंदिन नवीन रुग्णसंख्या 50,000 पेक्षा कमी आहे. केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी समन्वयाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेच हे फलित आहे.

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या आज 4,09,394 इतकी असून, सध्या तिचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 1.31% इतके आहे.

कोविड चाचण्या करण्याच्या क्षमतेत देशभरात लक्षणीय वाढ झाल्याने गेल्या चोवीस तासांत देशात एकूण 17,18,439 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकूण 45.09 कोटीपेक्षा अधिक (45,09,11,712) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

एकीकडे देशातील चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात यश आले असून त्याचवेळी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी म्हणजे कोरोना झाल्याचे निदान होण्याचा दर सध्या 2.12% इतका आहे, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 2.41% इतका आहे. गेल्या सलग 31 दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3% पेक्षा कमी आहे, तर तो 5% पेक्षा कमी असण्याचा हा सलग पंचेचाळीसावा दिवस आहे.

 

Exit mobile version