Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीच्या 5.5 कोटी पेक्षा जास्त मात्रा

गेल्या 24 तासात लाभार्थींना 23 लाखाहून जास्त मात्रा

भारतात लसीकरण अभियानाने वेग घेतला असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 9,01,887 सत्राद्वारे 5.5 कोटीहून अधिक (5,55,04,440) लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 80,34,547 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (पहिली मात्रा), 51,04,398 आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी (दुसरी मात्रा), 85,99,981 आघाडीवर राहून काम करणारे कर्मचारी (पहिली मात्रा ), 33,98,570 आघाडीवर काम करणारे कर्मचारी (दुसरी मात्रा), 55,99,772 लाभार्थी 45 वर्षावरील आणि सह व्याधी असणारे (पहिली मात्रा) तर साठ वर्षावरील 2,47,67,172 लाभार्थी यांचा समावेश आहे.

देशातल्या लसीकरणापैकी 60% जास्त लसीकरण आठ राज्यात झाले आहे.

लसीकरण अभियानाच्या 69 व्या दिवशी (25 मार्च 2021) लसीच्या 23 लाखाहून अधिक (23,58,731) मात्रा देण्यात आल्या. 40,595 सत्राद्वारे 21,54,934 लाभार्थींना पहिली मात्रा  आणि 2,03,797 आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरचे कर्मचारी यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

गेल्या 24 तासात देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांपैकी 70% लसीकरण दहा राज्यात करण्यात आले आहे.

महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरात या पाच राज्यात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे.

गेल्या 24 तासात 59,118 नव्या रुग्णांची नोंद झाली.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 35,952 नव्या रुग्णांची नोंद झाली. पंजाबमध्ये  2,661, कर्नाटकमध्ये  2,523 नव्या रुग्णांची नोंद झाली.

दहा राज्यात कोविड-19 च्या दैनंदिन रुग्ण संख्येचा आलेख चढता आहे.

भारतात फेब्रुवारीच्या मध्यात सर्वात कमी संख्येची नोंद झाल्यानंतर एकूण सक्रीय रुग्णसंख्येत वाढ जारी आहे. आज ही संख्या 4.21 लाख (4,21,066)  आहे.

देशातल्या एकूण सक्रीय रुग्ण संख्येपैकी 73.64% महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या तीन राज्यात आहेत.

देशात एकूण 1,12,64,637 कोरोना मुक्त झाले असून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 95.09% आहे.

गेल्या 24 तासात 32,987 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 257 मृत्यूंची नोंद झाली.

यापैकी  78.6% मृत्यू सहा राज्यातले आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 111 मृत्यूंची नोंद झाली. पंजाब मध्ये 43 जणांचा मृत्यू झाला.

14 राज्ये/केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड-19 मुळे एकही मृत्यूची नोंद नाही. राजस्थान, जम्मू काश्मीर (केंद्र शासित प्रदेश), झारखंड, ओडिशा, पुद्डूचेरी, लक्षद्वीप, सिक्कीम, लडाख (केंद्र शासित प्रदेश), दादरा नगर हवेली आणि दमण दीव, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम,अंदमान निकोबार आणि अरुणाचल प्रदेश यांचा यात समावेश आहे.

Exit mobile version