भारताने गेल्या 7 महिन्यांमधील नवीन रुग्णांची सर्वात कमी दैनंदिन संख्या नोंदवली, गेल्या 24 तासांत 10,064 नवे बाधित रुग्ण आढळले
जागतिक महामारीविरूद्धच्या लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. दररोज आढळणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येने आज नीचांकी पातळी गाठली आहे.
सात महिन्यांनंतर गेल्या 24 तासांत एकूण राष्ट्रीय संख्येमध्ये 10,064 नव्या रुग्णांची भर पडली. 12 जून 2021 रोजी 10,956 नवे रुग्ण आढळले होते.
भारताची उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या आज 2 लाखापर्यंत (2,00,528) घसरली आहे.
भारताच्या सध्याच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण एकूण बाधित रुग्णांच्या केवळ 1.90 % आहे.
दररोजच्या नवीन रुग्णांमध्ये घट होण्याबरोबरच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड 19 विरुद्ध लसीकरण केले जाणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. लसीकरण केलेल्या एकूण लोकांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा दुपटीने जास्त आहे.
गेल्या 24 तासांत 3,930 सत्रांमध्ये 2,23,669 लोकांचे लसीकरण करण्यात आले लसीकरण झालेल्यांची एकूण संख्या 4,54,049 (आतापर्यन्त झालेल्या 7,860 सत्रांमधून ) वर पोहचली आहे.
लाभार्थींची राज्यनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:
S. No. | State/UT | Beneficiaries vaccinated |
1 | A & N Islands | 442 |
2 | Andhra Pradesh | 46,680 |
3 | Arunachal Pradesh | 2,805 |
4 | Assam | 5,542 |
5 | Bihar | 33,389 |
6 | Chandigarh | 265 |
7 | Chhattisgarh | 10,872 |
8 | Dadra & Nagar Haveli | 80 |
9 | Daman & Diu | 43 |
10 | Delhi | 7,968 |
11 | Goa | 426 |
12 | Gujarat | 10,787 |
13 | Haryana | 17,642 |
14 | Himachal Pradesh | 4,817 |
15 | Jammu & Kashmir | 3,375 |
16 | Jharkhand | 6,059 |
17 | Karnataka | 66,392 |
18 | Kerala | 15,477 |
19 | Ladakh | 119 |
20 | Lakshadweep | 201 |
21 | Madhya Pradesh | 18,174 |
22 | Maharashtra | 18,582 |
23 | Manipur | 978 |
24 | Meghalaya | 530 |
25 | Mizoram | 554 |
26 | Nagaland | 1,436 |
27 | Odisha | 46,506 |
28 | Puducherry | 554 |
29 | Punjab | 3,318 |
30 | Rajasthan | 23,546 |
31 | Sikkim | 120 |
32 | Tamil Nadu | 16,462 |
33 | Telangana | 17,408 |
34 | Tripura | 1,736 |
35 | Uttar Pradesh | 22,644 |
36 | Uttarakhand | 4,237 |
37 | West Bengal | 29,866 |
38 | Miscellaneous | 14,017 |
चाचणीच्या पायाभूत सुविधांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सकारात्मकतेच्या दरामध्येही मोठी घसरण दिसून आली.
भारताचा साप्ताहिक सकारात्मकता दर 1.97% आहे.
22 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा साप्ताहिक सकारात्मकता दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
13 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा साप्ताहिक सकारात्मकता दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.
अंदाजे 8 महिन्यांनंतर देशात गेल्या 24 तासांत 140 पेक्षा कमी मृत्यूची (137 मृत्यू) नोंद झाली.
भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर आज 96.66 % वर गेला आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,02,28,753 वर पोहोचली आहे, तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,08,012 इतकी आहे.
गेल्या 24 तासांत देशात 17,411 रुग्ण बरे झाले.
नव्याने बरे झालेल्या रुग्णांपैकी 80.41% रुग्ण दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
केरळमध्ये काल एकाच दिवसात सर्वाधिक 3,921 रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 3,854 रुग्ण बरे झाले तर छत्तीसगडमध्ये 1,301 रुग्ण बरे झाले.
नवीन रुग्णांपैकी 71.76% रुग्ण सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
केरळमध्ये नवीन रुग्णांची संख्या अधिक आढळत असून काल 3,346.नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये अनुक्रमे 1,924 आणि 551 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या 24 तासांत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 72.99 टक्के मृत्यूची नोंद आठ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे.
महाराष्ट्रात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये 17 तर पश्चिम बंगालमध्ये 10 नवीन मृत्यूची नोंद झाली.