Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात 6 लाखांच्या जवळपास कोरोना रुग्ण झाले बरे

मागील 24 तासात 20,000 हून अधिक रुग्ण झाले बरे, रुग्ण बरे होण्याचा दर 63.24%

गेल्या 24 तासात कोविड-19 च्या रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. 20,572 रुग्ण बरे झाले असून कोविड-19 च्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 5,92,031 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज 63.24 % झाला आहे.

आग्रही चाचणी,वेळेवर निदान आणि गृह अलगीकरण किंवा रुग्णालयात सक्रिय वैद्यकीय सहाय्य याच्या माध्यमातून रूग्णांचे प्रभावी व्यवस्थापन केल्याने रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे.

कोविड-19 च्या  सक्रीय रुग्णांची संख्या 3,19,840 असून ते सर्व वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

ऑक्सिमेटरच्या वापरासह गृह अलगीकरणाचे सर्व निकष आणि मानकांमुळे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांवर दबाव न आणता लक्षण नसलेल्या किंवा सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर देखरेख ठेवण्यास मदत झाली आहे.

बरे झालेल्या आणि सक्रीय रुग्णांमधील दरी सातत्याने वाढत आहे. आज हा आकडा 2,72,191 आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या तुलनेत 1.85 पटींनी जास्त आहे.

भारतात कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये 1378 समर्पित कोविड रुग्णालये (डीसीएच), 3077 समर्पित कोविड आरोग्य केंद्रे (डीसीएचसी) आणि 10351 कोविड सुश्रुषा केंद्र (सीसीसी) यांचा समावेश आहे.

त्यांच्याकडे कोविड-19 रूग्णांवर उपचार करण्यासाठी एकूण 21,738 व्हेंटिलेटर, 46,487 आयसीयू खाटा आणि 1,65,361 ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा आहेत.

Exit mobile version