देशातील रुग्ण बरे होण्याचा दर देखील सर्वोच्च पातळीवर,73% पेक्षा अधिक
जलद गतीने एकूण 3 कोटी चाचण्यांचा टप्पा पार करतानाच भारताने आणखी एक उच्चांक नोंदवला आहे. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आज 20 लाखांच्या पुढे गेली.(20,37,870)
त्याचबरोबर गेल्या 24 तासांत 60,091 इतक्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने कोविड -19 रूग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे तसेच गृह विलगीकरण (सौम्य आणि मध्यम लक्षणे ) पूर्ण केल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 73% ( 73.44%) या नव्या उच्चांकावर पोहचला असून मृत्युदरातही घट झाली आहे . मृत्युदर आज 1.91% या नीचांकी पातळीवर आहे.
बरे झालेल्या रुग्णांच्या विक्रमी संख्येमुळे देशातील उपचार सुरु असलेले रुग्ण म्हणजेच सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे आणि सध्या हे प्रमाण एकूण सकारात्मक रुग्णांच्या 1/4 पेक्षा कमी (केवळ 24.45%) आहे. बरे झालेल्या रुग्णांची वाढती संख्या आणि घटता मृत्यूदर हे दर्शवतो की भारताची श्रेणीबद्ध रणनीती यशस्वी ठरली आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा (6,76,514).बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13,61,356 ने अधिक आहे.
जानेवारी 2020 च्या सुरुवातीपासून, केंद्र सरकारने कोविड -19साठी श्रेणीबद्ध, पूर्व-प्रेरक आणि सक्रिय प्रतिसाद आणि व्यवस्थापन रणनीतीचे काटेकोर पालन केले. केंद्रित, सहकार्यात्मक आणि ‘संपूर्ण सरकारी ’ दृष्टिकोन यशस्वी ठरला आहे.
राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१. १४ टक्के – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि.१८: राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. आज ११ हजार ११९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ६४ हजार ३८४ नमुन्यांपैकी ६ लाख १५ हजार ४७७ नमुने पॉझिटिव्ह (१८.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ३५ हजार ७४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार १७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.