सक्रीय रुग्णाच्या संख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 28 लाखांनी अधिक
कोरोनातून रुग्ण लवकर बरे होण्याच्या प्रवासात भारताने आज नवा टप्पा गाठला. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा देशाचा आलेख चढता असून हा दर 78 % पर्यंत पोहोचला आहे. दररोज बरे होणाऱ्यांची वाढती संख्या यातून प्रतीत होत आहे.
गेल्या 24 तासात 77,512 रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या आता 37,80,107 झाली आहे. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यातले अंतर सातत्याने वाढत असून आज हे अंतर सुमारे 28 लाख (27,93,509) झाले आहे.
देशातल्या सक्रीय रुग्णांची सध्याची संख्या 9,86,598 आहे.
सक्रीय रुग्णांपैकी 60 % पेक्षा जास्त रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यात आहेत.एकूण बरे झालेल्यांपैकीही 60 % संख्या या पाच राज्यातली आहे.
देशात गेल्या 24 तासात 92,071 नव्या रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महाराष्ट्रातली संख्या जास्त असून गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 22,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. तर आंध्रप्रदेशात 9,800 पेक्षा जास्त नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत.
एकूण रुग्णांपैकी सुमारे 60 % रुग्ण महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यात आहेत.
गेल्या 24 तासात 1,136 मृत्यू झाले असून त्यापैकी सुमारे 53 % महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यातले आहेत. त्यानंतर तामिळनाडू, पंजाब आणि आंध्रप्रदेश ही राज्ये आहेत.
काल नोंद झालेल्या मृत्यूपैकी 36 % पेक्षा जास्त मृत्यू महाराष्ट्रात(416 मृत्यू ) झाले आहेत.