कोरोना रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 95 % वर

161 दिवसानंतर दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 22,065

कोरोना विरोधातल्या लढ्यात भारताने अनेक महत्वाचे टप्पे साध्य केले आहेत.

गेल्या 24 तासात पुष्टी झालेल्या  नव्या रुग्णांची संख्या 22,100 च्या खाली गेली आहे. 161 दिवसानंतर दैनंदिन नव्या रुग्णांची संख्या 22,065 झाली आहे. 7 जुलै 2020 ला नव्या रुग्णांची संख्या 22,252 होती.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001YN82.jpg

दर दिवशी बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या मोठ्या संख्येमुळे आणि सातत्याने कमी होणाऱ्या मृत्यू दरामुळे सक्रीय रुग्ण संख्या कमी होण्याचा भारताचा कल कायम राहिला आहे.

आणखी एका कामगिरीद्वारे सक्रीय रुग्ण संख्येत मोठी घट होत ही संख्या 3.4 लाखापेक्षा कमी झाली आहे. देशातल्या एकूण सक्रीय रुग्णांची  सध्याची संख्या  3,39,820 असून ती  एकूण रुग्ण संख्येच्या 3.43 % आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002115Q.jpg

सक्रीय रुग्ण संख्येत घट होण्याबरोबरच रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही  वाढ नोंदवली जात आहे.  बरे झालेल्यांची एकूण संख्या 94 लाखापेक्षा जास्त झाली आहे (94,22,636). सक्रीय रुग्ण आणि बरे झालेले यांच्यातले अंतर सातत्याने वाढत असून ते 90,82,816 झाले आहे.

रुग्ण बरे होण्याचा दर आणखी सुधारला असून तो 95.12% झाला आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003O4OW.jpg

रुग्ण संख्या जास्त असलेल्या देशामध्ये रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक असलेल्या देशांपैकी भारत एक आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00428EZ.jpg

गेल्या 24 तासात देशात 34,477 रुग्ण कोरोनातून बरे झाले.

बरे झालेल्यां रुग्णापैकी 74.24% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

बरे झालेल्यांची एका दिवसातली सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली असून इथे एका दिवसात 4,610 रुग्ण बरे झाले. केरळमध्ये ही संख्या 4,481 तर पश्चिम बंगाल मध्ये ही संख्या 2,980 होती.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005AO38.jpg

नव्या रुग्णांपैकी 73.52% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशात आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे  2,949 दैनंदिन रुग्णांची नोंद झाली असून केरळमध्ये 2,707 नव्या रुग्णांची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006PI4E.jpg

गेल्या 24 तासात 354  मृत्यूंची नोंद झाली.

या पैकी सुमारे 79.66% मृत्यू 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्र आणि  दिल्लीमध्ये सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन प्रत्येकी  60 मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल मध्ये 43   मृत्यूंची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007IQ9Y.jpg