गेल्या 24 तासात कोरोनाच्या 31,923 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद

भारतातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने केला 83 कोटींचा महत्वपूर्ण टप्पा पार.

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.77%

भारतात गेल्या 24 तासात 71,38,205 मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत एकूण 83 कोटींपेक्षा अधिक मात्रा (83,39,90,049) देण्यात आल्या आहेत. एकूण 81,69,260 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या, वयोगटानिहाय एकूण लसीकरणाच्या आकडेवारीत पुढीलप्रमाणे लसींच्या मात्रांचा समावेश आहे-

 

HCWs 1st Dose 1,03,70,205
2nd Dose 87,85,834
 

FLWs

1st Dose 1,83,47,309
2nd Dose 1,46,71,244
 

Age Group 18-44 years

1st Dose 33,77,76,289
2nd Dose 6,69,10,347
 

Age Group 45-59 years

1st Dose 15,37,13,610
2nd Dose 7,15,16,250
 

Over 60 years

1st Dose 9,83,05,587
2nd Dose 5,35,93,374
Total 83,39,90,049

गेल्या 24 तासात 31,990 रुग्ण कोविडमुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,28,15,731 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

त्यामुळे बरे होण्याचा दर आता 97.77%.झाला आहे. बरे होण्याचा दर सध्या गेल्या मार्च 2020 पासून सर्वाधिक स्तरावर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 88 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद आता होत आहे.

गेल्या 24 तासात 31,923 नव्या रुग्णांची नोंद झाली

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,01,640 आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या, आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.90% आहेत. ही गेल्या मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु आहे. देशात गेल्या 24 तासात एकूण 15,27,443 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 55.83 कोटींहून अधिक (55,83,67,013) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.11% असून गेले 90 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.09% इतका आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर गेले 24 दिवस 3% पेक्षा कमी आणि 107 दिवस 5% पेक्षा कमी आहे.