भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या 57 दिवसांनंतर 13 लाखांपेक्षा कमी
गेल्या 24 तासांत, भारतात 92,596 इतक्या दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या सलग दोन दिवसात देशभरात एक लाखांहून कमी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे.
भारतात सक्रिय रुग्णसंख्येमध्ये सतत घट होत आहे. देशातील सक्रीय रुग्णसंख्या आज 12,31,415 इतकी नोंदवली गेली. सलग नऊ दिवसांपासून रुग्णसंख्या 20 लाखांपेक्षा कमी आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत 72,287 ची घट नोंदवली गेली आहे आणि सध्या देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी केवळ 4.23% रुग्ण उपचाराधीन आहेत.
भारतात दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या, दैनंदिन नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा सलग 27 व्या दिवशी अधिक आहे. गेल्या 24 तासात 1,62,664 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली.
दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत, गेल्या 24 तासांत 70,068 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.
या महामारीचा संसर्ग सुरू झाल्यापासून आजपर्यंत 2,75,04,126 नागरीक कोविड -19 या आजारातून बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासांत 1,62,664 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर सतत वाढता कल दर्शवत असून तो 94.55% इतका आहे.
गेल्या 24 तासात देशभरात एकूण 19,85,967 चाचण्या करण्यात आल्या आणि आतापर्यंत भारताने एकूण 37 कोटी (37,01, 93,563) चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
देशभरात एकीकडे चाचण्या करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे, परंतु साप्ताहिक पाँझिटिव्हिटी दरात सतत घट दिसून येत आहे. सध्या साप्ताहिक पाँझिटिव्हिटी दर 5.66% वर आहे तर दैनंदिन पाँझिटिव्हिटी दर आज 4.66% आहे. आता सलग 16 दिवस हा दर 10% पेक्षा कमी राहिलेला आहे.
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरात राबविल्या जाणाऱ्या कोविड -19 लसींच्या मात्रांच्या एकूण संख्येने आज 23.90 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत 27,76,096 लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण 23,90 58,360 लसींच्या मात्रा 33,44,533 सत्रांद्वारे देण्यात आल्या आहेत.
त्या खालील आलेखात समाविष्ट आहेत:
HCWs | 1st Dose | 99,96,113 |
2nd Dose | 68,94,206 | |
FLWs | 1st Dose | 1,63,86,094 |
2nd Dose | 87,28,340 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 3,18,51,951 |
2nd Dose | 3,18,313 | |
Age Group 45 to 60 years | 1st Dose | 7,26,04,407 |
2nd Dose | 1,15,39,053 | |
Over 60 years | 1st Dose | 6,12,98,568 |
2nd Dose | 1,94,41,315 | |
Total |