देशात कोरोना बाधित रुग्ण घटले

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या (2,82,520) एकूण बाधितांच्या संख्येच्या 0.84%

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 87 कोटी 66 लाखाहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण

गेल्या 24 तासांत देशात 18,870 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 54,13,332 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 87 कोटी 66 लाखाहून अधिक (87,66,63,490)   मात्रांची संख्या पार केली आहे. देशभरात 85,33,076 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे :

HCWs 1st Dose 1,03,72,249
2nd Dose 88,66,949
 

FLWs

1st Dose 1,83,50,759
2nd Dose 1,49,20,275
 

Age Group 18-44 years

1st Dose 35,52,19,972
2nd Dose 7,89,51,672
 

Age Group 45-59 years

1st Dose 15,82,40,987
2nd Dose 7,55,11,327
 

Over 60 years

1st Dose 10,06,79,594
2nd Dose 5,55,49,706
Total 87,66,63,490

गेल्या 24 तासांत 28,178 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची  सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,29,86,180 झाली आहे.

परिणामी, सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 97.83% आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.

केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग चौऱ्याण्णव दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.

भारतात प्रतिदिन नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या सलग दोन दिवस 20,000 हून कमी आहे.  गेल्या 24 तासांत, 18,870  नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 2,82,520 इतकी आहे आणि ही गेल्या 194 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.84% आहे.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 15,04,713 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 56 कोटी 74 लाखांहून अधिक (56,74,50,185) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.82% असून गेले 96 दिवस हा दर 3%हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 1.25% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 30 दिवस 3% हून कमी आहे आणि आता गेले सलग 113 दिवस हा दर 5% हून कमी राहिला आहे.