Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 30,941 नवे दैनंदिन रुग्ण

देशातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 64 कोटी मात्रांचा महत्वपूर्ण टप्पा

देशातील  कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने काल 64 कोटी मात्रांचा  महत्वपूर्ण टप्पा पार केला

देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत देशात  गेल्या 24 तासात 59,62,286  मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत 64.05  कोटीपेक्षा जास्त मात्रा (64,05,28,644) दिल्या आहेत. एकूण 68,50,464 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये समावेश आहे-

HCWs 1st Dose 1,03,57,727
2nd Dose 83,70,851
 

FLWs

1st Dose 1,83,20,921
2nd Dose 1,31,39,739
 

Age Group 18-44 years

1st Dose 24,75,08,226
2nd Dose 2,72,63,275
 

Age Group 45-59 years

1st Dose 13,02,09,298
2nd Dose 5,40,22,975
 

Over 60 years

1st Dose 8,66,24,593
2nd Dose 4,47,11,039
Total 64,05,28,644

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.
गेल्या 24 तासात  36,275 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून( महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,19,59,680 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
यामुळे कोरोनातून बरे होण्याचा दर 97.53 इतका झाला आहे.

सलग  65  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात  30,941 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 3,70,640 आहे.उपचाराधीन रुग्णसंख्या ही आतापर्यंतच्या , एकूण रुग्णसंख्येच्या 1.13 %   आहे.

 

देशात कोविड चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून, गेल्या 24 तासात 13,94,573  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत  52.15 कोटीहून अधिक  (52,15,41,098) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.51% असून गेले 67 दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी 2.22% असून गेले  85  दिवस  5% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version