Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 16,156 नवे दैनंदिन रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.20%, मार्च 2020 पासून सर्वोच्च

भारतात गेल्या 24 तासात  49,09,254  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा, देण्यात आल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 104.04 कोटीपेक्षा अधिक (1,04,04,99,873)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,03,62,667 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या  आहेत.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे-

 

HCWs

1st Dose 1,03,78,578
2nd Dose 91,82,272
 

FLWs

1st Dose 1,83,70,444
2nd Dose 1,58,24,383
 

Age Group 18-44 years

1st Dose 41,26,09,938
2nd Dose 13,34,07,626
 

Age Group 45-59 years

1st Dose 17,33,06,910
2nd Dose 9,35,00,396
 

Over 60 years

1st Dose 10,88,31,281
2nd Dose 6,50,88,045
Total 1,04,04,99,873

गेल्या 24 तासात 17,095 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,36,14,434 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

परिणामी कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.20% झाला आहे.हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर आहे.

सलग 123 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

मागील 24 तासात 16,156 नव्या रूग्णांची नोंद झाली.

सध्या सक्रीय रुग्ण संख्या 1,60,989 इतकी असून ही  संख्या गेल्या 243  दिवसातली  सर्वात कमी आहे. देशात सक्रीय  रुग्णांची संख्या  एकूण उपचाराधीन  रुग्णांच्या 0.47% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 12,90,900 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 60.44 कोटीहून अधिक  (60,44,98,405) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.19% असून गेले  34 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.25% असून गेले 24 दिवस 2% पेक्षा कमी आणि 59  दिवस  3% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version