देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 14,313 नवे दैनंदिन रुग्ण

भारतातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 105.43 कोटीहून अधिक

भारतात गेल्या 24 तासात  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या 56,91,175  मात्रा देण्यात आल्या असून, आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 105.43 कोटीपेक्षा अधिक (1,05,43,13,977)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,05,30,690 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या  आहेत.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे-

 

HCWs

1st Dose 1,03,78,868
2nd Dose 92,06,421
 

FLWs

1st Dose 1,83,71,365
2nd Dose 1,58,88,942
 

Age Group 18-44 years

1st Dose 41,65,22,627
2nd Dose 13,88,92,149
 

Age Group 45-59 years

1st Dose 17,42,68,245
2nd Dose 9,52,99,427
 

Over 60 years

1st Dose 10,93,98,998
2nd Dose 6,60,86,935
Total 1,05,43,13,977

 

गेल्या 24 तासात 13,543 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,36,41,175 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

परिणामी कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.19% झाला आहे.

सलग 125 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

मागील 24 तासात 14,313 नव्या रूग्णांची नोंद झाली.

सध्या सक्रीय रुग्ण संख्या 1,61,555 इतकी असून ही संख्या एकूण पॉझीटीव्ह  रुग्णांच्या 0.47% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

देशभरात चाचण्या  करण्याच्या क्षमतेतील वाढ सुरु आहे. देशात गेल्या 24 तासात 11,76,850 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 60.70 कोटीहून अधिक  (60,70,62,619) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.18% असून गेले  36 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.22% असून गेले 26 दिवस 2% पेक्षा कमी आणि 61  दिवस  3% पेक्षा कमी आहे.