देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 14,306 नवे दैनंदिन रुग्ण

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 102.27 कोटीहून अधिक

भारताने गेल्या 24 तासात  12,30,720  कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण   102.27 कोटीपेक्षा जास्त  (1,02,27,12,895)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,01,52,393सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

गेल्या 24 तासात 18,762 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,35,67,367 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

 

HCWs

1st Dose 1,03,78,224
2nd Dose 91,50,822
 

FLWs

1st Dose 1,83,69,475
2nd Dose 1,57,27,472
 

Age Group 18-44 years

1st Dose 40,72,14,067
2nd Dose 12,62,73,063
 

Age Group 45-59 years

1st Dose 17,20,53,801
2nd Dose 9,11,69,536
 

Over 60 years

1st Dose 10,81,37,930
2nd Dose 6,39,04,274
Total 1,02,27,12,895

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.18% झाला आहे.हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च आहे.

सलग  120 दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 14,306 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  2 लाखाच्या खाली कायम असून सध्याची 1,67,695  ही संख्या 239  दिवसातली  सर्वात कमी संख्या आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.49% आहेत.

चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 9,98,397 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 60.07 कोटीहून अधिक  (60,07,69,717) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.24%  असून गेले  31 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.43% असून गेले 21  दिवस 2% पेक्षा कमी आणि 56  दिवस  3% पेक्षा कमी आहे.