Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोरोना : देशात रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.35%

गेल्या 24 तासात 8,306 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात 24,55,911 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारताने 127.93 (1,27,93,09,669) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,1,32,86,429 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs 1st Dose 1,03,84,617
2nd Dose 95,48,009
 

FLWs

1st Dose 1,83,81,233
2nd Dose 1,65,92,175
 

Age Group 18-44 years

1st Dose 46,75,22,029
2nd Dose 24,44,87,121
 

Age Group 45-59 years

1st Dose 18,69,15,771
2nd Dose 12,62,94,812
 

Over 60 years

1st Dose 11,69,97,622
2nd Dose 8,21,86,280
Total 1,27,93,09,669

गेल्या 24 तासांत 8,834 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,40,69,608 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.35% झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 162 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 8,306 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 98,416 आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.28% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 8,86,263 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 64.82 (64,82,59,067) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.78% असून गेल्या 22 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.94% असून गेले 63 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 98 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version