भारतातील सक्रीय रुग्णांची संख्या 5 लाखांहून कमी
भारताताली सक्रिय रुग्ण संख्या 5 लाखांहून कमी असून, ती आज 4,85,547 इतकी आहे. पाच लाखांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण संख्या असण्याचा हा आजचा तिसरा दिवस आहे. एकूण बाधित संख्येत त्यांचा वाटा 5.55 % आहे.
नवीन रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे हे शक्य झाले आहे, ज्यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
एकूण 44,879 नवीन नोंदविलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत गेल्या 24 तासांत 49,079 रुग्ण बरे झाले आहेत, नवीन रुग्ण संख्येपेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक हा भारतातील कल सलग 41 व्या दिवशी कायम आहे.
देशात बरे झालेली एकूण रुग्णसंख्या 81,15,580 तर बरे झालेला रुग्णदर 92.97% इतका आहे. बरे झालेली रुग्णांची संख्या आणि सक्रिय रुग्णसंख्या यातील फरक सातत्याने वाढत आहे आणि सध्या तो 76,31,033 इतका आहे.
बरे झालेल्या रुग्णसंख्येपैकी 77.83 % संख्या ही 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेश यामधील असल्याचे लक्षात आले आहे.
एका दिवसात मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली आहे. 7,809 नव्याने बरे झालेल्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 16,05,064 वर गेली आहे.
नवीन रुग्णांपैकी 76.25 % रुग्ण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेश यामधील असल्याचे लक्षात आले आहे.
दिल्ली येथे दैनंदिन नव्या आढळणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या 24 तासात 7,503 इतकी होती. केरळ येथे 5,537 इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर महाराष्ट्रात 4,496 इतकी नव्या रुग्णांची नोंद काल करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासात 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये साधारण 80 % (79.34 %) अर्थात 547 मृत्यूंची नोंदवण्यात आले आहेत.
यापैकी 22.3 % मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली आहे, जिथे 122 मृत्यू झाले आहेत. दिल्ली आणि पश्चिम बंगाल येथे अनुक्रमे 104 आणि 54 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.