रुग्ण संख्या 3.6 लाखांहून खाली आली
भारतात उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्येत निरंतर घट होत आहे. उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आज 3.6 लाखांच्या (3,59,819) खाली आली आहे.
गेल्या आठवड्यातील सरासरीनुसार सर्वात जास्त प्रभावित असलेल्या 6 राज्यांमधील दैनंदिन रुग्ण संख्येत सतत घट दर्शवत आहे.
गेल्या 24 तासांत दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या 30,006 आहे, तर त्याच काळात 33,494 रुग्ण उपचारा नंतर बरे होऊन घरी गेले आहेत.
एकूण 93,24,328 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेल्या रुग्णांमधील तफावत निरंतर वाढत आहे आणि सध्या ती 89,64,509 आहे.
बरे झालेल्या रुग्णांपैकी 74.46% रुग्ण हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आहेत
महाराष्ट्रात काल 2,774 रुग्ण बरे झाले आहेत.
नवीन रुग्णांपैकी 74.16% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
केरळमध्ये काल सर्वाधिक 4,642 नवे रुग्ण आढळले. त्या खालोखाल महाराष्ट्रात काल 4,268 नवे रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 442 मृत्यूंची नोंद झाली.
यापैकी 78.05% मृत्यू 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
नवीन मृत्यूपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक(87) मृत्यू झाले आहेत. गेल्या बर्याच दिवसांपासून दैनंदिन मृत्यू संख्येमध्ये सतत घट होत आहे.