देशात सक्रिय रुग्ण संख्येचा दर उतरता

भारतामध्ये एका दिवसातील रुग्ण बरे होण्याचा नवा उच्चांक; गेल्या 24 तासांत 62,282 रुग्ण बरे झाले

रुग्ण झपाट्याने बरे होण्याचा चढता आलेख अबाधित ठेवत, भारताने गेल्या 24 तासात कोविड-19 मधून बरे होऊन घरी जाणाऱ्या 62,282 रुग्णसंख्येचा नवीन उच्चांक नोंदविला आहे.

मोठ्या संख्येने रूग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे तसेच गृह विलगीकरण (सौम्य आणि मध्यम लक्षणे ) पूर्ण केल्यामुळे आज 21.5 लाख रुग्ण बरे होण्याचा टप्पा पार झाला आहे (21,58,946). बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय कोविड – १९ चे रुग्ण यातील अंतर वाढून आज १४,६६,९१८ पर्यंत पोहोचले आहे. जास्त संख्येने रुग्ण बरे होत असल्यामुळे, त्यांची टक्केवारी सातत्याने वाढत आहे आणि सक्रिय रुग्ण संख्या हळूहळू घटते आहे.

सध्याची सक्रिय रुग्ण संख्या (६,९२,०२८) देशातील वास्तविक रुग्ण संख्या दर्शवितात. ही आजच्या बाधित रुग्ण संख्येच्या २३.८२ टक्के आहे, गेल्या २४ तासात ही नोंद कमी झाली आहे. ते सक्रीय वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.


रुग्णालयांमधील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचार, देखरेखीखाली असलेले गृह विलगीकरण, ऑक्सिजन पुरवठ्याचा सौम्य वापर, तत्पर आणि वेळेत वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी रुग्णांची ने – आण करणारी रुग्णवाहिकेची सुधारित सुविधा, नवी दिल्लीच्या एआयआयएमएस कडून दिल्या जाणाऱ्या टेली कन्सल्टेशनच्या माध्यमातून कोविड – १९ च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची वैद्यकीय कौशल्य अद्ययावत करणे,
यावर बारकाईने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, त्यामुळे या सगळ्या एक अन एक मुद्द्यावर एकत्रित काम केल्याचा परिणाम, हे प्रभावी रुग्ण व्यवस्थापनास कारणूभीत ठरले आहे. यामुळे हे सुनिश्चित झाले आहे की भारतातील रग्णांचा मृत्यू दर (सीएफआर) जागतिक सरासरीच्या खाली राखला जाईल. तो सतत सकारात्मक घसरत आहे आणि सध्या तो १.८९ टक्के इतका आहे.

गेल्या २४ तासात रोगाचे बाधित रुग्ण पडताळण्यासाठी ८,०५,९८५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. याच्या आतापर्यंत ३,३,४६७,२३७ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
चाचणी प्रयोगशाळांचे जाळे देशभरात सातत्याने बळकट होत आहे, आजच्या दिवशी देशभरात १५०४ प्रयोगशाळा असून, ९७८ शासकीय प्रयोगशाळा आणि ५२६ खासगी प्रयोगशाळा आहेत.

यामध्ये –
रिअल टाइम रॅपिड टेस्ट आधारित चाचणी प्रयोगशाळा – ७७२ ( सरकारी – ४५३ + खासगी ३१९)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा – ६१४ (सरकारी – ४९१ + खासगी – १२३)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा – ११८ (सरकारी – ३४ + खासगी ८४)