Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोरोना : राज्यात दहावी बारावीच्या परीक्षा होणार ऑफलाइन

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार का या प्रश्नावर राज्य परीक्षा मंडळाने उत्तर दिले असून या परीक्षांची ऑफलाईन तयारी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणे अशक्य असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने सांगितले आहे. या परीक्षांसाठी 17 नंबरचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे या परीक्षा स्थगित कराव्यात किंवा पुढे ढकलाव्या याबाबत अद्याप कोणताही निर्णय बोर्डाला कळविण्यात आलेला नाही. त्यामुळे या परिक्षांची तयारी सुरू केल्याची माहिती मंडळाच्या सुत्रांनी दिली. तसेच 17 नंबरचा फॉर्म भरुन 12 वी आणि 10 वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. 12 जानेवारी पर्यत अतिविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, “सद्यस्थितीत दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्याचं निश्चित असून वेगळा निर्णय घेण्यात आलेला नाही. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.”

Exit mobile version