Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

निर्यातक्षम मालाचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र यंत्रणा

मालीच्या वाणिज्यदूतांनी घेतली कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट; कृषि माल प्रक्रिया, शीतगृह उभारणी आणि निर्यातीवर चर्चा

मुंबई, दि. 6 : मालीचे वाणिज्यदूत विकास मित्तरसेन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कृषि मंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी कृषि विभागाचे सहसचिव सुशील खोडवेकर उपस्थित होते.

निर्यातक्षम मालाचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा

राज्यात निर्यातक्षम कृषिमालाचे उत्पादन कसे करता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विभागाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणार असल्याचे सांगून कृषिमंत्री श्री.भुसे यांनी आगामी काळात कृषिमाल उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांची एक परिषद आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही दिली.

दर्जेदार हळद उत्पादनावर भर

राज्यात दर्जेदार हळदीचे उत्पादन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचविण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहितीही कृषिमंत्री श्री.भुसे यांनी दिली.

कृषि माल प्रक्रिया, शीतगृह उभारणी आणि कृषि मालाची निर्यात या बाबींवर दोन्ही बाजूच्या मान्यवरांनी आपापल्या भागातील माहितीची देवाणघेवाण केली.

Exit mobile version