पशुपालकांसाठी आनंदाची बातमी; आता येणार कॉम्प्रेस्ड बायोगॅस

पशुपालक आणि जनावरे असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जनावरांच्या शेण-मुत्रापासून तयार होणारा बायोगॅस आता कॉम्प्रेस स्वरुपात बाजारात आणला जाणार आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पशुधन आहे, त्याच्या गोठ्यातील शेणाला आता चांगलीच मागणी येण्याची शक्यता आहे.

पशुपालनातील व सागरातील टाकाऊ पदार्थांसह जंगल आणि शेतीतील टाकाऊ पदार्थ यासारख्या रासायनिक तसेच जैविक टाकाऊ पदार्थांचे परिणामकारक व्यवस्थापन करून वाहतुकीसाठी पर्यायी हरित इंधन म्हणून कॉम्प्रेस्ड बायोगॅसला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने किफायतशीर वाहतुकीसाठी पर्यायी शाश्वत उपक्रम (सतत) 1.10.2018 रोजी सुरू केला.

या उपक्रमात खासगी उद्योजकांकडून मोठ्या संख्येने कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प स्थापनेची कल्पना आहे. सतत योजनेचा एक भाग म्हणून, तेल आणि गॅस विपणन कंपन्या दीर्घ मुदतीच्या आधारावर कॉम्प्रेस्ड बायोगॅस खरेदीसाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) ला आमंत्रित करीत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्ज वितरणासाठी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांचा प्राधान्य यादीत समावेश केला आहे.