भारतात 12.38 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या
जगातल्या सर्वात मोठ्या लसीकरण अभियाना अंतर्गत भारतात 12.38 कोटी पेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक मात्रा देण्यात आल्या आहेत.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार भारतात 18,37,373 सत्राद्वारे लसीच्या 12,38,52,566 मात्रा देण्यात आल्या.
यामध्ये 91,36,134 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 57,20,048 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,12,63,909 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 55,32,396 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा ), 60 वर्षावरील 4,59,05,265लाभार्थी ( पहिली मात्रा ), 40,90,388 (दुसरी मात्रा ),45 ते 60 वयोगटातल्या 4,10,66,462 ( पहिली मात्रा ), आणि 11,37,964 (दुसरी मात्रा ), यांचा समावेश आहे.
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 59.42% मात्रा आठ राज्यात देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 12 लाखापेक्षा जास्त लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
लसीकरण अभियानाच्या 93 व्या दिवशी (18 एप्रिल 2021) ला 12,30,007 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 9,40,725 लाभार्थींना 21,905 सत्रात पहिली मात्रा आणि 2,89,282 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली.
भारतात दैनंदिन नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात 2,73,810 नव्या रुग्णांची नोंद झाली.
नव्या रुग्णांपैकी 78.58% रुग्ण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांमध्ये आहेत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 68,631 नव्या रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर उत्तर प्रदेश 30,566 आणि दिल्लीत 25,462 नव्या रुग्णांची नोंद आली.
आलेखात दर्शवल्याप्रमाणे 20 राज्यात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे.
भारतात आज उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 19,29,329 आहे. ही देशातल्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 12.81% आहे.
खाली दर्शवलेला आलेख भारतातल्या सक्रीय रुग्ण संख्येचा आलेख दर्शवतो.
देशातल्या एकूण उपचाराधीन रुग्णसंख्येपैकी 63.18% महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यांमध्ये आहेत.
भारतात एकूण 1,29,53,821 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 86.00% आहे.
गेल्या 24 तासात 1,44,178 रुग्ण कोरोनातून बरे झाले.
राष्ट्रीय मृत्यू दरात घट होत असून हा दर सध्या 1.19% आहे.
गेल्या 24 तासात 1,619 रुग्णांचा मृत्यू झाला.
यापैकी 85.11% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 503 जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर छत्तीसगड मध्ये 170 जणांचा मृत्यू झाला.
दहा राज्ये / केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड -19 मुळे एकही मृत्यू झालेला नाही. यामध्ये लडाख ( केंद्रशासित प्रदेश ), दमण आणि दीव आणि दादरा नगर हवेली, त्रिपुरा, सिक्कीम, मिझोरम,मणिपूर,लक्षदीप, नागालँड, अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.
प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) मार्च 2020 मध्ये जाहीर करण्यात आली आणि मुदतीत तिसऱ्यांदा वाढ करत ती 24 एप्रिल 2021 करण्यात आली. कोविड-19 शी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीचे हे पॅकेज त्यांना दुर्दैवी प्रसंगाला तोंड द्यावे लागल्यास त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी आहे. या योजने अंतर्गत 50 लाख रुपयांचे विमा कवच पुरवण्यात येते.कोविड मुळे प्राण गमवाव्या लागलेल्या कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबियांना या अंतर्गत सुरक्षा जाळे पुरवण्यात येते. आतापर्यंत 287 दावे विमा कंपन्यांनी दिले आहेत. कोविड-19 शी लढा देण्यात आघाडीवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यात ही योजना महत्वाची मानसिक भूमिका बजावत आहे.
कोविड योद्ध्यांचे प्रधान मंत्री गरीब कल्याण पॅकेज विमा पॉलिसी दावे 24 एप्रिल 2021 पर्यंत निकालात काढणे सुरूच राहणार, त्यानंतर कोविड योध्यांसाठी नवी विमा पॉलिसी अमलात येणार आहे.