राज्यात आता महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व अकृषी, अभिमत, स्वायत्त विद्यापीठे, तंत्रनिकेतन आणि संलग्न महाविद्यालयांचे वर्ग १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. या काळात शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहेत.

सामंत यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व विद्यापीठांच्या आणि संलग्न महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. प्रत्येक जिल्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही या निर्णयाप्रत आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारने गेल्या १३ ऑक्टोबर रोजी महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू करण्याच निर्णय घेतला होता. लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजला येण्याची परवानगी दिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो आहे. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.