राज्यातील वाढत्या कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज असून लोकांनी मास्क वापरणे, अंतर पाळणे, गर्दी न करणे यांचा काटेकोरपणे अवलंब करावा अन्यथा लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिला. जनतेशी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांचे संभाषण पुढील व्हिडीओवर पाहा
देशातील महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू,केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या आठ राज्यांमध्ये रोज सापडणाऱ्या नव्य कोविड ग्रस्तांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. नव्याने नोंद झालेल्या एकूण रुग्णांपैकी 81.25% रुग्ण या आठ राज्यांमधील आहेत.
गेल्या 24 तासांत,81,466 नव्या कोविड ग्रस्तांची नोंद झाली.
एका दिवसात सापडणाऱ्या नव्या रुग्णांपैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 43,183 रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 4,617 तर कर्नाटकात 4,234 नवे रुग्ण सापडले.
खाली दर्शविल्याप्रमाणे, 10 राज्यांमध्ये रुग्णसंख्येत सतत मोठी वाढ होण्याचा कल कायम आहे.
भारतातील एकूण कोविड सक्रीय रुग्णसंख्या 6,14,696 वर पोहोचली आहे.हे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येच्या 5% आहे. गेल्या 24 तासांत, एकूण सक्रीय रुग्णसंख्या 30,641 ने कमी झाली.
देशातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 77.91% रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, केरळ आणि पंजाब या पाच राज्यात आहेत. एकूण सक्रीय रुग्णांपैकी सुमारे 60% (59.84%) रुग्ण फक्त महाराष्ट्रात आहेत.
देशातील ओदिशा, लडाख (कें.प्र.), दीव-दमणआणि दादरा-नगर हवेली, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, लक्षद्वीप, मेघालय, मिझोरम, अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि अरुणाचल प्रदेश या 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या 24 तासांत कोविड संसर्गामुळे रुग्ण दगावल्याची नोंद नाही.