कांद्याचे बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

 एनएचआरडीएफच्या लासलगाव येथील केंद्रावर कांदा बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी प्रचंड  गर्दी केली. परिणामी कोरोनातील शारीरिक अंतर नियमाचा बोजवारा उडाला.
प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ)मध्ये तयार झालेल्या दर्जेदार कांदा बियाणास संपूर्ण राज्यातून दरवर्षी चांगली मागणी असते यंदा ही 1 ऑगस्टपासून कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याने बियाणे खरेदीसाठी नाशिक ,नगर, औरंगाबाद धुळे ,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी लासलगाव येथे शेकडोच्या संख्येने एकाच वेळी कांदा बियाणे खरेदी करण्यासाठी केंद्रावर जमल्याने चांगलाच गोंधळ उडाला.
अगदी रात्रीपासून बियाणासाठी केंद्रावर रांगा लागत असून बियाणे मिळत नसल्याने कृषी मंत्री दादा भुसे यांचेकडे तक्रार करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
दिवसभरात शंभर ते दीडशे शेतकऱ्यांना 10 ते 4 किलो ॲग्रीफाउंड लाईट रेड उन्हाळी वाण कांदा बियाणे उपलब्ध करून देत आहोत.
-सत्येंद्र सिंग, एनएचआरडीएफ संचालक 

अग्रीफाउंड लाईट रेड उन्हाळी वाण 1993 मध्ये एनएचआरडीएफ मार्फत विकसित केलेले असून  कांदा रंग फिकट लाल, आकार गोलाकार, कांदावरील आवरण घट्ट, रोपांचा लागवडीनंतर 100 – 120 दिवसांत काढणीस तयार, साठवण क्षमता अतिशय चांगली यामुळे शेतकरी या वाणाला पसंती देतात.