मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

नाशिक, ता. ३० : मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक ठिकाणी पुन्हा पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. मध्यंतरी मराठवाडा, कोकण, आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने दिलासा दिला. मात्र पुन्हा खंड पडला. या आठवड्यात उद्या दिनांक ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर पर्यंतच्या काळात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस दिलासा देणार आहे. दुसरीकडे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने पुढील २४ तासात मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील ४ दिवसात कोंकण गोव्यासह, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान या आठवड्यात मॉन्सून पुन्हा सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी या आठवड्यात पावसाळा सुरुवात झाली आहे. आता पर्यंत झालेल्या पावसाने अनेक धरणामध्ये अजूनही पुरेसा पाणी साठा झालेला नाही .  आज नाशिकसह परिसरात सकाळपासून हलक्या ते मध्यम पावसाळा सुरवात झाली आहे. नाशिक परिसरातील धरण साठा भरल्यास त्याचा मराठवाड्याला उपयोग होणार आहे.