Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता

28 ते 30 एप्रिल दरम्यान दक्षिण कर्नाटक आणि उत्तर केरळमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

भारतीय हवामान शास्त्र विभाग (आयएमडी) च्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने जारी केलेल्या भारतीय हवामान वृत्तानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडासह देशाच्या विविध भागात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुजरात आणि ओडिशा  किनारपट्टीवर काही तुरळक ठिकाणी  उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

28 ते 30 एप्रिल दरम्यान  दक्षिण  कर्नाटक आणि उत्तर केरळमध्ये तुरळक  ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .

29 आणि 30 एप्रिलला विदर्भासह देशाच्या अनेक भागात  विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे .

 

अंदाज नव्हे माहिती!

संपुर्ण उत्तर व पश्चिम महाराष्ट्रावर, मराठवाडा, विदर्भ, कोंकण येथे विखुरलेल्या स्वरुपात ढगाळ वातावरण व कमी – अधिक – तुरळक (साधारण 10mm पेक्षाही कमी) पाऊस होईल. शेतकर्यांनी मुळीच घाबरु नये! नैसर्गिक ‘न्यू नाॅर्मल’ शी जुळवून घेण्यासाठी देशी गावठी बी-बियाणे व सेंद्रीय कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती हाच ठाम तरणोपाय आहे!

-भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे

Exit mobile version