मराठवाड्यात तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता

दिनांक 12 व 13 नोव्हेंबर रोजी उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार  मराठवाडयातील उस्मानाबाद व लातूर जिल्हयात दिनांक 12 व 13 नोव्हेंबर रोजी तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.