हवामान इशारा : मराठवाड्यात कमी ते मध्यम पावसाची शक्यता

उत्तर अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

भारतीय हवामान विभागाच्या चक्रीवादळ इशारा विभागाने दिलेल्या चेतावणीनुसार, अंदमान समुद्र आणि शेजारील भागात 09 ऑक्टोबर रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्य दिशेकडे उद्या, 10 ऑक्टोबर 2020 रोजी सरकणार असून मध्य बंगालच्या उपसागरात याची तीव्रता वाढेल.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश, ओदिशा, तेलंगण, कर्नाटकातील काही भाग आणि महाराष्ट्रात खराब हवामानाची परिस्थिती निर्माण होईल.

बदलेल्या हवामान परिस्थितीमुळे 10 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.