अतिवृष्टीग्रस्त भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणी, दुरुस्तीसाठी नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश

नागपूरदि. 24 : पूर्व विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज पारशिवनी तालुक्यातील सालई-माहुली आणि मौदा तालुक्यातील माथनी येथील पुलाचीपाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची व जलवाहिन्यांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणी तसेच दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या पथकात केंद्रीय रस्ते व दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांचा समावेश होता. पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारेकार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प नागपूर मिलींद बांधवकर,  सहाय्यक अभियंता सुनील दमाहेशाखा अभियंता ए. एस. महाजनमंडळ अधिकारी राजेश घुडेतलाठी विश्वजित पुरामकर पथकासोबत होते. 

सालई येथील पेंच नदीवरील पुलाचे बांधकाम करताना जमिनीतील काठिण्यतापुराच्या पाण्याची मारकक्षमता आदी तांत्रिक बाबींचा विचार करणे आवश्यक होते. तर माथनी येथील इंग्रजकालीन पूल असल्यामुळे तो पूल तात्काळ किरकोळ दुरुस्ती करुन हलक्या वाहनांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत श्री. व्यास यांनी सूचना केल्या. मौदा शहर आणि माथनी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी आणि जलवाहिनीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे माथनीला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकी व जलवाहिनीचे किरकोळ दुरुस्तीचे काम केल्याबाबत श्री. व्यास यांनी समाधान व्यक्त केले. मात्रमौदा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे आणि पुलाच्या नुकसानीबाबत असमाधान व्यक्त केले. 

पाण्याच्या जलकुंभासाठी आवश्यक जलवाहिनीचे बांधकाम करताना राष्ट्रीय महामार्गाकडून बांधकामाची तांत्रिक माहिती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्या माहितीच्या आधारावर नव्याने प्रस्ताव पाठवण्याचे निर्देशही मुख्य अभियंता श्री. व्यास यांनी राज्य शासनाच्या संबंधित विभागाला दिले. 

मध्य प्रदेशातील चौराई धरणातून 29 ऑगस्टला पेंच नदीमध्ये अचानक विसर्ग सोडण्यात आला होता. त्यामुळे पारशिवनी आणि मौदा तालुक्यात अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. सालई-माहुली येथील पुलाचा काही भाग कोसळला तर माथनी येथील नदीच्या पुलाचे नुकसान झाले. 

पुलाचे झालेले नुकसान पाहता नैसर्गिक आपत्ती मोठी होतीहे सिद्ध होतेअसे सांगून त्यांनी श्री. बांधवकर यांच्याकडून पुलाचे बांधकामत्याचे तंत्रज्ञानआणि इतर अनुषंगिक बाबींची माहिती घेतली. नवीन पुलाचे बांधकाम करताना बांधकामाची पद्धत बदलावी लागेलअसे सांगून श्री. व्यास यांनी पुलाच्या बांधकामातील तांत्रिक उणिवांकडे लक्ष वेधले. 

गेल्या काही दिवसांपासून देशात नैसर्गिक आपत्तीमध्ये अनपेक्षित वाढ होत आहे. राज्यातील विविध भागातील पाहणी दौरा केल्यामुळे या बाबी प्रकर्षाने अधोरेखित झाल्याचे त्यांनी सांगितले. पेंच नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला वाट काढून देऊन सालई -माहुली येथील नागरिकांना तात्पुरत्या रस्त्याची पर्यायी व्यवस्था करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. पुलाच्या पुनर्बांधणीसाठी निधी मिळणे आवश्यक असूनत्याबाबत मंत्रालयाकडे तशी माहिती सादर केली जाईल. मात्र राज्य शासनाकडून पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावामध्ये या बाबी प्रकर्षाने स्पष्ट करण्याच्या सूचना केल्या.