Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यातील पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

केंद्रीय पथक समितीतील सदस्यांनी शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

औरंगाबाद तालुक्यातील निपाणीपिंपळगाव पांढरीपैठण तालुक्यातील गाजीपूरनिलजगावशेकटा आणि गंगापूर तालुक्यातील मुरमीढोरेगावजाखमाथा आणि वरखेड येथील शेतकऱ्यांशी त्यांच्या थेट बांधावर जाऊन केंद्रीय पथक प्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार गंताकेंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर.बी.कौल यांनी आज पाहणी करून संवाद साधला. अति पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत दुःख व्यक्त करत शासनाची लवकरच मदत मिळेलअसे आश्वासन शेतकऱ्यांना केंद्रीय पथकाच्या समितीने दिले.

 

पाहणी दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरजिल्हाधिकारी सुनील चव्हाणअप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटेउपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदींसह  वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

 

मुरमी येथील संजय म्हस्के यांच्या शेतातील ज्वारीमकाच्या नुकसानीची माहिती विभागीय आयुक्त श्री.केंद्रेकर यांनी सदस्यांना  दिली. ढोरेगाव येथील अहेमद जाफर  शेख यांनी सव्वा एकर मका पिकाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. तसेच धर्म बेडवाल यांनीही दोन एकरातील कापसाचे अति पावसाने नुकसान झाले आहे. जाखमाथा येथे सदानंद थोरात यांच्या दोन एकर शेतातील अद्रक खराब झाली असल्यानेबाळासाहेब जाधव यांच्या शेतातील बाजरीवरखेड येथे विकास उबाळे यांच्या एकर क्षेत्रातील मका आणि दोन एकरातील कापूस पिकांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

श्री. गंता आणि श्री. कौल यांनी तुमच्या पिकांची पाहणी केली आहेपंचनामा झाला आहे,  झालेल्या नुकसानीची पाहणीही केली आहेशासनाच्या नियमाप्रमाणे मदतही मिळेल’ असे शेतकऱ्यांना सांगितले. त्याचबरोबर वरखेड येथील पाणंद रस्त्याची पाहणी आणि गौतम कांबळे यांच्या शेतातील कांदा लागवाडीचीही पाहणी त्यांनी केली.

 

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी पथकाच्या पाहणीबाबत सांगताना पथकाने जिल्हातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूसमकासोयाबीनबाजरीअद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आहेजास्त पावसामुळे शेतकऱ्यांना कापणी करता आली नाहीत्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहेया नुकसानीची योग्य तपासणी पथकातील समिती सदस्यांनी केली आहेत्यामुळे जिल्ह्याला योग्य न्याय मिळेलअशी अपेक्षाही जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली.

 औरंगाबादपैठण तालुक्यातील शेतकऱ्यांशीही संवाद

औरंगाबाद तालुक्यातील निपाणी येथे सुनील कालानंदू भालेकरसंदीप दुदलदिलीप भालेकरसखाराम पुंगळेलहू भालेकरपिंपळगाव पांढरी येथे विपिन कासलीवालविठ्ठल बहुरेगाजीपूर येथे रामभाऊ राहतवाडेनिलजगाव येथे मच्छिंद्र मोगल आणि शेकटा येथे हरिश्चंद्र भवर यांच्याशी देखील केंद्रीय पथक प्रमुख श्री. गंता आणि श्री. कौल यांनी संवाद साधत नुकसानीची पीक पाहणी केली.

Exit mobile version