रेल्वेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे

क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेरे 686 स्थानकांवर बसविण्यात आले आहेत. क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रवासी आरक्षण केंद्रावर तसेच मुख्य रेल्वे स्थानकांच्या इतर भागात ऑनलाईन देखरेख केली जाते.

कोणतीही बेकायदेशीर / संशयास्पद कृती आढळल्यास त्वरित कारवाई केली जाते. सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे होणाऱ्या देखरेखीचा उपयोग करून व्यक्तींच्या प्रवेशाला प्रतिबंध केला जात नाही,  मात्र , संशयास्पद / आक्षेपार्ह कृती करत असलेल्या व्यक्तींवर पाळत ठेवली जाते आणि आवश्यकतेनुसार हस्तक्षेप केला जातो.

रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग व ग्राहक व्यवहार, अन्न आणि  सार्वजनिक वितरण मंत्री श्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या  लेखी उत्तरात ही माहिती दिली.