झोप न येणे यामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. रात्री नीट झोप नाही मग सकाळी आळस येतो , कामं लवकर होत नाही, चिडचिड , कंटाळा सगळं एकाच वेळी होतं. छान सुखाची शांत झोप लोकांच्या नशिबी नाही की काय अशीच शंका येते कारण हल्ली बरेच लोक झोप येत नाही यामुळे चिंताग्रस्त आहेत.
बऱ्याच लोकांचं कामं हे कंप्युटरवर असत. कामं करताना अनेकांना झोप येते. पुस्तक वाचताना झोप येते कारण त्यावेळी डोळ्यांवर ताण पडत असतो. पण परत थोड्या वेळात जग येते अशी तक्रार करणारे देखील खूप आहेत. झोपेसाठी असलेले काही उपाय.
१. फिश, अंडी, अक्रोड किंवा भोपळय़ाच्या बिया आदीच्या सेवनामुळे तुमचा तणाव दूर होतो व शरीर रिलॅक्स होते आणि तुम्हाला झोप येते. सुकामेवा खाणे कधीही योग्य. फळे, सुका मेवा, काकडी, टोमॅटो, रताळे आदीच्या सेवनाने शरीरात पाण्याचे संतुलन राहते. तसेच रक्तदाबही नियंत्रित राहतो. शांत झोप लागते.
२. स्निग्ध पदार्थांचा आहारात समावेश असावा. जसे दही, लोणी , तूप. याचमुळे कढी, पुरणपोळी असे खाल्ल्यास छान झोप लागते. पालेभाज्या, गाजर, शेंगभाज्या, डाळी, चॉकलेट, केळी, धान्य इ गोष्टी आहारात असल्यास आपल्याला मॅग्नेशियम मिळते. त्यामुळे झोप न येण्याच्या समस्येसह उच्च रक्तदाब आणि डोकेदुखीची समस्याही दूर होते.
३. आपल्या डोळ्यासमोर सतत कॉम्प्युटर, मोबाईलची स्क्रीन असतेच. सततचा हा वापर देखील तुमच्या निद्रानाशाचे कारण बनू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करावा पण आपल्या शरीराची हानी होईल इतका करू नये. शरीराची काहीच हालचाल नाही असेही नको. शरीराला थोडा तरी व्यायाम असावा.
अशा प्रकारच्या आपल्या आहारातील बदलामुळे आपल्याला झोप लागू शकते. झोप पूर्ण झाल्यास तुमचे डोके शांत राहते. तुमची कामे पटापट होतात. त्यामुळे तुमची चिडचिडही होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा आहार सेवन करा.