Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीपासून नागपूरात

राज्याचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार आहे. येत्या 28 फेब्रुवारी रोजी हे अधिवेशन होणार असल्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

आज विधीमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पुढील अधिवेशनावर चर्चा झाली. काँग्रेसने मागच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत आग्रह धरला होता.

त्यामुळे पुढील अधिवेशन नागपुरात घेण्याचे आश्वासन काँग्रेस नेत्यांना दिले होते. त्यानुसार अधिवेशनाची तारीख आणि स्थान जाहीर करण्यात आली आहे. या आधी सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा आग्रह विरोधकांनीही धरला होता.

त्यावर मुख्यमंत्री आजारी असून त्यांना हवाई प्रवास सुद्धा करण्यास मनाई करण्यात आल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितलं होतं. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिल्याने हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईला घेण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी ठेवला होता.

तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत नसेल तर पुढील अधिवेशन मुंबई ऐवजी नागपुरात घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. सत्ताधाऱ्यांनीही या मागणीला संमती दिली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे.

Exit mobile version