पाईप कालवाद्वारे ६० टक्के पाणी बचत होणार

बोरी अंबेदरी, दहिकुटे पाईप कालवा कामांचे नियोजन आढावा बैठक आज कृषीमंत्री व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीला  पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अभिजित रौदंळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी  दिलीप देवरे, कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, आदिसह लाभ क्षेत्र भागातील शेतकरी उपस्थित होते.

दहीकुटे लघु पाटबंधारे प्रकल्पाचा मुख्य कालावा  6.54 कि.मी. मध्ये बंदीस्त नलीकेव्दारा पाणी पुरवठा करण्याचे विशेष दुरुस्तीचा कामास 7.36 कोटी एवढया रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी बैठकीत दिली.

सदर कामाचे अंदाजपत्रक रकक्म 7 कोटी 35 लाख 39 हजार 603  इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकस मुख्य अभियंता जलसंपदा विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिली असून निविदा प्रक्रिया प्रगतीपथवर असल्याचे मंत्री भुसे यांनी बैठकीत नमूद केले. या गृहीतकाने प्रकल्पाचा प्रति हेक्टरी विसर्ग हा रब्बी हंगामाकरीता 148 क्युसेसक्स प्रति हेक्टरी इतका आहे. खरीप हंगामाकरीता 85 क्युसेक्स प्रति हेक्टरी इतका परिगणित होतो.

कार्यक्षेत्रची स्थलाकृती निहाय सिंचन क्षेत्र सुटसुटीत सिंचन व्यवस्थानचा विचार करता सदर कालव्यावरुन सिंचनाचे नियोजन हे 12 दिवस आवर्तण कालावधीमध्ये दोन टप्पांमध्ये प्रस्तावित करण्यात आले आहे.

यावेळी मंत्री भुसे म्हणाले की, आपल्या गावामध्ये सर्व्हेक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना माहिती दयावी शेतकरी कंपनी स्थापन करावची असून 30 टक्के योजना महिलासाठी आहेत. जास्तीत जास्त योजनाचा लाभ यामुळे घेता येईल.

बैठकीत मध्य भारत व्यसाय प्रमुख कृष्णात महामुलकर यांनी उपस्थितांना पावर पाईट व्दारे माहिती दिली.   लाभ क्षेत्र भागातील   शेतकऱ्यांनी बैठकीत भाग घेऊन योजनेची माहिती घेतली व त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली.