सूक्ष्मजीवांपासून होणार बायोडीझेलचा विकास

जीवाश्म इंधन नष्ट होत असतानाही, भारताच्या सभोवतालच्या सागरी वातावरणामधील एकपेशीय वनस्पतींची इंधनक्षमता दुर्लक्षित असल्याचे आढळते. बायोडीझेल उत्पादनासाठी सूक्ष्मजीवांमध्ये लिपिड संचय वाढविण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा अभ्यास आणि साधनांवर काम करणाऱ्या वैज्ञानिकाच्या प्रयत्नांमुळे सागरातून उत्पन्न होणाऱ्या सूक्ष्मजीवांपासून कमी किंमतीचे बायोडीझेल लवकरच एका वास्तवात रूपांतरित होऊ शकते.

पेट्रोलिअम – आधारित इंधनांमध्ये वेगाने होणारी घट लक्षात घेऊन, तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली मधील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे डॉ. टी. मथिमनी यांनी नूतनीकरणक्षम आणि शाश्वत स्त्रोतांकडून पर्यायी इंधन शोधण्यास प्रारंभ केला आहे.

अलिकडेच शोधण्यात आलेल्या विविध प्रकारच्या जैव इंधनांपेक्षा, सूक्ष्मजीवांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या जैव इंधनाच्या उत्पादनांचा प्राधान्याने विचारात घेण्यात आला आहे, कारण ते अन्य जैव इंधनाच्या कच्च्या मालापेक्षा अनेक पटींनी फायदेशीर ठरत आहे आणि शाश्वत इंधनाच्या माध्यमातून त्यांना याची प्रेरणा मिळाली आहे.

परवडणाऱ्या बायोडिझेल उत्पादनासाठी

आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या बायोडिझेल उत्पादनासाठी सागरी सूक्ष्मजीवांमध्ये ट्रायसिग्लिसेरोल सामग्री वाढविण्याच्या तंत्राविषयी त्यांनी केलेल्या सादरीकरणाला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने स्थापित इनोव्हेशन इन सायन्स पर्स्यूट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च (INSPIRE) विद्याशाखेची फेलोशिप मिळाली आहे.

`केमोस्फेअर` जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या आपल्या संशोधनात, डॉ. टी. मथीमनी आणि त्यांच्या सहकारी संघाने केलेल्या मांडणीनुसार, तामिळनाडूच्या किनारपट्टी प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या पिकॉक्लोरम एसपी., सिनेडेस्मस एसपी.क्लोरेला एसपी. या सागरी सूक्ष्मजीव प्रजातींमध्ये बायोडिझेल निर्मितीसाठी आवश्यक अशी एकूण सेंद्रिय कार्बन सामग्री आणि ट्रायसेलग्लीसेरिडेस (टीएजी) मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

ते आता त्यांच्या अन्य जैवतंत्रज्ञान विषयक क्षमता आणि स्विचेबल पोलॅरिटी सॉलव्हन्ट (एसपीएस) यंत्रणेवर आधारित लिपिड गोळा करण्यासाठी इतर मायक्रोअल्गल घटकांवर लक्ष केंद्रित करीत आहेत.

एसपीएस हे एक ऊर्जा कार्यक्षम स्विचेबल सॉलव्हन्ट आहे, जे कोणत्याही औष्णिक प्रक्रियेविना पुन्हा मिळवता येऊ शकते आणि पर्यावरणावर कोणताही परिणाम न करता अल्गल लिपिड मिळविण्यासाठी पुन्हा वापरला जाऊ शकते.

बायोडिझेल उत्पादन वाढविण्यासाठी टीएजी स्तर वाढवून मेटाबोलिक अभियांत्रिकी पद्धती वापरल्या जाऊ शकतात, आणि मॅग्नेटिक नॅनोकम्पोझिट (एमएनसी) वापरून सूक्ष्मजीवातून पाणी वेगळे केले जाते, आणि कल्चर सस्पेन्शनचा पुनर्वापर करून बायोडिझेलचा उत्पादन खर्च प्रभावीपणे कमी केला जाऊ शकतो. या तीन पद्धतींचा अवलंब करून कमी उत्पादन खर्चातील आणि शाश्वत बायोडिझेलची निर्मिती करता येऊ शकते, याचा विचार संशोधनात मांडला जाईल.

हा गट एक रोडमॅप तयार करेल ज्याद्वारे बायोडिझेल व्यावसायिकपणे उत्पादित केले जाऊ शकेल आणि ऊर्जा कायमस्वरूपी निर्माण करता येईल.