सलग 4 दिवस बँका राहणार बंद

उद्या (दि. 13) पासून देशात सलग 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. एप्रिलमध्ये एकूण 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. तर या आठवड्यात बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत बँकाच्या सुट्ट्या लक्षात घेऊन बँकेतील सर्व काम व्यवस्थापित करणं आवश्यक आहे. खाली दिलेल्या यादीत जाणून घ्या एप्रिलमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद असणार आहेत.

सर्व राज्यांत एकसमान नियम नाहीत

सर्व राज्यात बँकाना एकसमान सुट्ट्या नाहीत. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एकाच दिवशी साजरा केला केला जात नाही. आरबीआयच्या वेबसाइटवरील उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये 9 दिवस बँका बंद राहणार आहेत.

बँकेच्या सुट्ट्यांची यादी

– 13 एप्रिल – मंगळवार – उगाडी, तेलगू नवीन वर्ष, बोहाग बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव

– 14 एप्रिल – बुधवार – डॉ. आंबेडकर जयंती, सम्राट अशोका जन्मदिन, तमिळ नवीन वर्ष, महा विशुबा संक्रांती, बोहाग बिहू

– 15 एप्रिल – गुरुवार – हिमाचल दिन, विशु, बंगाली नवीन वर्ष, सरहुल

– 16 एप्रिल – शुक्रवार – बोहाग बिहू

– 18 एप्रिल – रविवार

– 21 एप्रिल – बुधवार – राम नवमी, गारिया पूजा

– 24 एप्रिल – चौथा शनिवार

– 25 एप्रिल – रविवार – महावीर जयंती

सणांमुळे बँका राहणार बंद

तेलुगू नववर्ष, बिहू, गुढी पाडवा, बैसाखी, बिजू महोत्सव आणि उगाडी या सणानिमित्त 13 एप्रिल रोजी बँकेला सुट्टी असेल. तर दुसर्‍या दिवशी म्हणजेच 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंती निमित्त बँका बंद असतील. त्यानंतर 15 एप्रिल रोजी हिमाचल दिन, विशु, बंगाली नववर्ष, सरहुल निमित्त काही राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे. यानंतर 21 एप्रिलला रामनवमी आणि 25 एप्रिलला महावीर जयंतीची सुट्टी असेल. तसेच 24 एप्रिल रोजी चौथा शनिवार असल्यानं त्या दिवशीही सुट्टी असणार आहे.