डिसेंबरमध्ये बँका १६ दिवस बंद; सर्वाधिक सुट्या

डिसेंबरमध्ये 16 दिवस बँक बंद राहणार आहे. हा आदेश आरबीआयने जारी केला आहे. डिसेंबरमध्ये ख्रिसमसचा सण देखील असतो ज्यामध्ये बँकेला नेहमीच सुट्टी असते. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. त्यामुळे तुमची काही कामे बँकेत असतील तर ती वेळीच करून घ्या.

डिसेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील याची माहिती पुढीलप्रमाणे
3 डिसेंबर – सेंट फ्रान्सिस झेवियरचा उत्सव (कनकदास जयंती/सेंट फ्रान्सिस झेवियरचा उत्सव) (पणजीमध्ये बँका बंद)
5 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
11 डिसेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
12 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 डिसेंबर – यू सो सो थामची पुण्यतिथी (शिलाँगमध्ये बँका बंद)
19 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
24 डिसेंबर – ख्रिसमस सण (आयझॉलमधील बँका बंद)
25 डिसेंबर – ख्रिसमस (भुवनेश्वर वगळता सर्व ठिकाणी बंद) शनिवार, (महिन्याचा चौथा शनिवार)
26 डिसेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
27 डिसेंबर – ख्रिसमस सेलिब्रेशन (आयझॉलमध्ये बँका बंद)
30 डिसेंबर – यू किआंग नोंगबाह (शिलॉंगमध्ये बँका बंद)
31 डिसेंबर – नवीन वर्षांची संध्याकाळ (आयझॉलमध्ये बँका बंद)