नाशिकमध्ये रस्त्यावर उतरून पालकमंत्री भुजबळ यांच्याकडून जनजागृती

निर्बंध पाळा अन्यथा लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही – छगन भुजबळ

नाशिक,दि.२६ मार्च:- नाशिक शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आवाहन केले. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक शहरातील विविध भागातील गर्दीच्या भागाची पाहणी केली. त्यांनी सिडको परिसरातील रानाप्रताप चौक या ठिकाणाहून पाहणीस सुरवात करत उत्तमनगर, पवननगर, त्रिमूर्ती चौक सिडको,शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड मार्गे पाहणी करत जिल्हाधिकारी कार्यालय या भागात पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले,दिलीप खैरे त्यांच्या समवेत उपस्थित होते.

पाहणी दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सिडको, सीबीएस, शालिमार, मेन रोड येथे नागरिक, दुकानदार, हॉटेल, रिक्षा चालक यांच्याशी संवाद साधत मास्क वापरण्यासह कोरोनाच्या नियमनाचे पालन करण्याचे आवाहन केले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊनचा पर्याय शिल्लक असल्याचे सांगत. मास्क आणि सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या दुकानदार, हॉटेल व्यवसायिक, विक्रेते, नागरिक यांच्याव