Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

रब्बी हंगाम ग्रामबिजोत्पादनासाठी महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज

ग्राम बिजोत्पादन योजनेत निवडण्यात आलेल्या महसूल मंडळातील गावातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 25 सप्टेंबर 2021 अर्ज करावीत.
राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत (एन एम एटी) बियाणे व लागवड साहित्य उपअभियान कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगाम 2021-22 मध्ये फार्म सेव्हड् सिड वृध्दीगत करून शेतकरी स्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने या उपअभियानांतर्गत हरभरा व गहु या पिकासाठी ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम कृषि विभाग व महाबिज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यास हरभरा पिकासाठी 6462 क्वि. व गहु पिकासाठी 940 क्वि.चे लक्षांक प्राप्त आहे. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत प्रति शेतकरी 1 एकरच्या मर्यादेत लाभ मिळणार आहे. हरभरा पिकासाठी 10 वर्षाच्या आतिल (जात- फुले विक्रम, राजविजय-202, AKG-1109, फुले विक्रांत) बियाण्यासाठी 25 रुपये प्रति किलो अनुदान देय आहे व 10 वर्षावरील (जात-जॅकी-9218, दीग्वीजय, विजय, विशाल, विराट) बियाण्यासाठी 12 रुपये प्रति किलो अनुदान देय आहे. तसेच गहु पिकासाठी 10 वर्षाच्या आतिल (जात- फुले समाधान, NPAW-1415) बियाण्यासाठी 20 रुपये प्रति किलो अनुदान देय आहे. 10 वर्षावरील (जात-MACs-6222, HI-1544, GW-496, लोकवन) बियाण्यासाठी 10 रुपये प्रति किलो अनुदान देय आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आनिवार्य आहे.
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी नजीकच्या सामुहिक सेवा केंद्रे, ठिकाणी जाऊन किंवा ज्या शेतकऱ्यांकडे android स्मार्ट मोबाईल वरून गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MahaDBT Farmer हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यावे. सदर सुविधा वापरकर्ता आयडी व आधार क्रमांक आधारीत असल्याने एकाच गावातून स्मार्ट मोबाईल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर सदर ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यास अनेक शेतकरी अर्ज करू शकतील. अधिक माहितीसाठी संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
Exit mobile version