निफाड ( प्रतिनिधी ) : तालुका कृषी कार्यालय निफाड यांच्यातर्फे तालुक्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी साठवलेले सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी घेण्यात येत आहे. या मोहीमे अंतर्गत तालुका कृषी अधिकारी पाटील व कृषी सहाय्यक श्रीमती जाधव यांच्या उपस्थितीत
निफाड तालुक्यातील सोनेवाडी बु. येथे शेतकरी सुखदेव तळेकर यांनी साठवलेल्या 17 क्विंटल सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी घेण्यात आली.
या प्रसंगी मोहीमेची माहीती देताना तालुका कृषी अधिकारी पाटील यांनी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान केले की, यावर्षी घरगुती किंवा बाजारातील बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. जर उगवण क्षमता 70 टक्के पेक्षा कमी असेल तर बियाणे वापराचे प्रमाण वाढवावे. तसेच उगवण क्षमता 60 टक्के पेक्षा कमी असल्यास बियाणे पेरणीसाठी वापरू नये. पेरणी करताना थायरम व ट्रायकोडर्मा, रायझोबियम पी. एस. बी यांची बीजप्रक्रिया करावी. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा अशीही सुचना त्यांनी याप्रसंगी केली.